पुणे ‘ पर्वतारोहणसारखे साहसी खेळ शिकवणारी स्वतंत्र गिर्यारोहण इन्स्टिट्यूट आता महाराष्ट्रातही सुरू होणार आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात सरकारकडे मागणी केली होती.सरकारने या इन्स्टिट्यूटसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले.
“लवकरच स्वतंत्र गिर्यारोहण इन्स्टिट्यूट होणार, आपल्या मागणीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.चंद्रकांत पाटील यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद!”, असं ट्वीट खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे.
ते म्हणाले की, “नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरींग धर्तीवर महाराष्ट्रात गिर्यारोहक इन्स्टिट्यूटची निर्मिती व्हावी अशी मागणी आपण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महोदयांकडे केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गडकिल्ले तमाम शिव-शंभू भक्तांसाठी शक्तीस्थळे आहेत. अनेकजण या गडकिल्ल्यांवर प्रेरणा घेण्यासाठी जात असतात. त्यासह अनेकांना गिर्यारोहणाची आवड आहे, कदाचित ती या महाराष्ट्राच्या मातीच्या रक्तातच असावी. या अनुषंगाने सर्व गिर्यारोहकांच्या दृष्टीने हे इन्स्टिट्यूट होणे आवश्यक असल्याने यासंदर्भात मी मागणी केली होती. मला सांगायला आनंद होतोय की आपल्या या मागणीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांतर्फे मी त्यांचे जाहीर आभार मानतो!”
0