
खेड आंबवली मार्गावरील पाटबंधारे वसाहतीच्या समोर भरणे येथे सोमवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास रणारणत्या उन्हात एका आय टेन हुंडाई कारने अचानक पेट घेतलायावेळी रस्त्यावरून जात असलेल्या स्थानिक पाणी टँकर चालकांच्या सतरकर्तेमुळे कारला लागलेली आग आटोक्यात आली.
या घटनेमध्ये कोणालाही दुखपत झाली नसून कारचे इंजिन मात्र पूर्णतः जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच खेड अग्निशमन दलाचे जवान घटनास्थली दाखल झाले व कारला लागलेली आग विझवण्यात आली.