
खेड :- लोटे औद्योगिक वसाहतीमधील विनती ऑरगॅनिक प्रा. लि. या रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपनीत आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात समीर कृष्णा खेडेकर (वय अंदाजे ३५) या कामगाराचा मृत्यू झाला. बॉयलरच्या एअर प्री-हिटरमध्ये वाढलेल्या दाबामुळे अचानक झालेल्या स्फोटात ही दुर्घटना घडली.

घटनेच्या वेळी समीर खेडेकर हे संबंधित यंत्राजवळ एकटेच कार्यरत होते. स्फोटामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तत्काळ सहकाऱ्यांनी त्यांना लाइफ केअर रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर