
मुंबई : राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्हही सभागृहांमध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा आक्रमक संघर्ष पाहायला मिळत आहे. सभागृहातील प्रक्षेपण टीव्हीद्वारे आणि इंटरेटद्वारे लाईव्ह पाहता येत असल्यामुळे प्रत्येक घडामोड राज्यातील नागरिकांपर्यंत सहजतेने पोहचत आहे.अशात सभागृहात असताना मंत्री अब्दुल सत्तार यांचा एक कारनामा कॅमेऱ्यात कैद झाला असून काँग्रेसने हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करत शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली होती. या भेटीनंतर पंतप्रधानांनी स्वतः ट्विट करत मुख्यमंत्र्यांचे कौतुक देखील केले होते. याच विषयावर विधान परिषदेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई भाष्य करत होते. यावेळी त्यांच्या मागे अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार बसले होते. देसाई बोलताना मागे बसलेले सत्तार एक पुडी काढतात आणि खातात. सत्तारांची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर काँग्रेसने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
विधानसभेत चर्चा सुरू असताना सत्तार महोदयांनी थेट पुडी काढून तोंडात टाकली आणि निर्धास्तपणे चघळत बसले. विधानसभेत पुडी खाऊन चगळतायत उद्या तिथे थुंकायलाही कमी करणार नाहीत
.शिंदे-फडणवीस सरकारच्या आमदारांना विधानसभा पानाची टपरी वाटते का?” असा सवाल उपस्थित करत काँग्रेसने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.