ठाणे : नवी मुंबई महापालिका हद्दीतील सानपाडा उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेमध्ये महापालिकेकडून विविध मैदानी खेळांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याच धर्तीवर ठाणे महापालिकेकडून मुंबई नाशिक महामार्गावरील नितीन जंक्शन ते कॅडबरी जंक्शन उड्डाण पुलाखालील मोकळ्या जागेमध्ये नागरिकांसाठी मैदानी खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे उड्डाण पुलाखालच्या जागेत ठाणेकरांना बॅडमिंटन, टेनिस आणि व्हॉलीबॉल कोर्ट, स्केटिंग रिंग सारख्या मैदानी खेळाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. यासाठी सुमारे १ कोटी पाच लाख रुपयांचा खर्च होणार असून ठाणे महापालिका आयुक्तांनी नुकतीच या खर्चाला मंजुरी दिल्यामुळे ही सुविधा ठाणेकरांना उपलब्ध होऊ शकणार आहे.
महापालिकांमध्ये ठाणे महापालिकेचा मानस आहे. महापालिकेचे क्षेत्रफळ १२८.२३ चौ. किमी इतके विस्तीर्ण असून शहरात ३७७ किमी लांबीचे रस्ते आणि पदपथ बांधण्यात आले आहे. झपाट्याने वाढणाऱ्या ठाणे शहराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातून निवडून जात असल्यामुळे महापालिकेकडून या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या माध्यमातून एकात्मिक शहर सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत शहराच्या सुशोभी-करणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील तीन हात नाका जंक्शन, नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन आणि गोल्डन डाईज जंक्शन येथील उड्डाणपुलांची कामे पहिल्या टप्प्यात झाली आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात या उड्डाणपुलाखाली मैदानी खेळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नितीन आणि कॅडबरी कंपनी जंक्शन या भागात यापूर्वी जाहिरात विभागाच्यावतीने नागरिकांना उद्यान विकसीत करून दिले आहे.
जाहिरात