एस.टी.बस अंगावरुन गेली,वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

Spread the love

गुहागर :- तालुक्यातील नवानगर मोहल्ला बसथांब्याजवळ गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान एका वृद्ध महिलेल्या अंगावरुन एस.टी. बस गेली . या अपघातात ६५ वर्षीय वृद्धा जागीच ठार झाली . या घटनेत पोलिसांनी एस . टी . बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी गुहागर आगारातून सुटणारी गुहागर धोपावे मार्गे वेलदूर ही एस . टी . बस ( एमएच १४ बीटी २९७० ) नवानगर मोहल्ला येथे सकाळी १०.३० च्या सुमारास आली . सदर एस . टी . चंद्रकांत लक्ष्मण सकपाळ ( रा . चिखली कदमवाडी , वय ५४ ) हे चालवित होते . या एस.टी. वर विजय विठ्ठल पवार ( रा . शृंगारतळी, वय ३३ ) हे वाहक होते . नवानगर मोहल्ला थांब्यावर एसटी बसनधील काही प्रवासी उतरले . वेलदूर , गुहागरला जाणारे प्रवासी गाडीत बसले . त्यानंतर एस . टी . बस सुरु झाली . बस थांब्यापासून एस.टी. बस सुमारे १५ मीटर इतकीच पुढे आली . इतक्यात नवानगर गावातून येणाऱ्या छोट्या पायवाटेवरुन मालती विठू रोहीलकर ( वय ६५ , रा . नवानगर ) ही महिला रस्त्यावर आली . प्रवाशांची चढ उतार करुन निघालेल्या एस . टी . बस चालकाला अचानक समोर आलेली महिला दिसली नाही . त्यामुळे एस . टी . बस ची धडक महिलेला बसली व महिला एस . टी . बस खाली पडली . एस . टी . बसची मागची चाके मालती यांच्या कंबर व पाठीवरुन गेली .जागीच मालती रोहीलकर यांचा मृत्यू झाला .
पोलिसांनी एस.टी. बस चालक चंद्रकांत सकपाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page