मुंबई – गोवा महामार्गावर कामथे उपजिल्हा रुग्णालयाजवळ रस्ता ओलांडत असताना एसटी बसची धडक बसून वृध्दाचा मृत्यू

Spread the love

चिपळूण :- मुंबई – गोवा महामार्गावर कामथे उपजिल्हा रुग्णालयाजवळ रस्ता ओलांडत असताना भरधाव एसटी बसची धडक बसून झालेल्या अपघातात ७७ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ बाळकृष्ण भेंडखळे ( रा . पेठमाप , सायनातळी चिपळूण ) असे मृताचे नाव आहे . हा अपघात दि . १५ मे रोजी सायंकाळी ५:१५ वाजण्याच्या सुमारास घडला . दशरथ भेंडखळे हे कामथे उपजिल्हा रुग्णालयासमोर रस्ता ओलांडत होते . कोसबी मुंढे ते चिपळूण अशी एसटी बस चालक प्रवीण पुरुषोत्तम कदम हे भरधाव वेगाने चालवित असताना कामथे उपजिल्हा रुग्णालयासमोर रस्ता ओलांडणारे दशरथ भेंडखळे यांना एसटी बसची धडक बसली व त्यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली . त्यांना तत्काळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . त्यात त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page