
चिपळूण : चिपळुणात हनुमान जन्मोत्सव सोहळ्यासाठी गावीआलेल्या ठाणेतील सहाय्यक पोलीस फौजदाराचा चिपळूण तालुक्यातील तिवरे येथे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू घटना बुधवारी ५ एप्रिल रोजी घडली. संजय मोरे (५६) असे या पोलिसाचे नाव आहे. मोरे हे ठाणे शहरातील राबोडी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस फौजदार म्हणून कार्यरत होते. चिपळूण पोलिसांच्या माहितीनुसार, संजय मोरे हे जन्मोत्सव सोहळ्यासाठी कुटुंबासह कारमधून आले होते. ५ एप्रिल रोजी दुपारी २च्या सुमारास ते चिपळूण-तिवरे या आपल्या सासरवाडीच्या घरी पोहचले होते. यावेळी मोरेंना अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी उपचारासाठी शहरातील रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोरेंना तपासून मृत घोषित केले.