जबलपूरला लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात; सांगलीच्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू…

Spread the love

सांगली- जबलपूर येथे लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. लष्कराचे वाहन हे जबलपूरहून बंगळूरूला जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या एका खासगी टँकरने गाडीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यात एका जवानाचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दुपारी १२ च्या सुमारास झाला.

या अपघातात राज्यातील सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील लोणारवाडी येथील रहिवाशी तसेच पॅरा कमांडो असलेले हवालदार पोपट भगवान खोत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. झाला. खोत यांचा एक सहकारी जखमी झाला. त्यांच्या मृत्यूमुळे लोणारवाडी गावावर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर खोत आणि त्याच्या जखमी सहकाऱ्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, उपचारपूर्वी खोत यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, खोत यांच्या निधनाची बातमी कळताच सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. पोपट खोत हे हुशार होते. लहानपणापासून त्यांना लष्करात जायचे होते. त्यांनी कमंडो प्रशिक्षण देखील पूर्ण केले होते. खोत यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई आणि बहिणी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी लोणारवाडी येथे आणले जाणार असून या ठिकाणी त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page