मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरी करण्याच्या कामादरम्यान दरड अंगावर कोसळून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सायंकाळी महामार्गावरील वांद्री या ठिकाणी घडली. अर्जून अजयआदिवासी (रा. मध्यप्रदेश, सध्या रा. कोळंबे ता. संगमेश्वर ) असे मृतं कामगाराचे नाव आहे
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जे. एम. म्हात्रे कंपनीकडून आरवली ते बावनदीदरम्यानचे काम सुरू आहे. महामार्गाच्या वांद्री येथे काम करीत असताना दरडीची माती घसरून काम करीत असलेल्या कामगारावर
पडल्याने गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.