सावंतवाडी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी फरारी असलेल्या आरोपीला गोव्यात अटक…

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | सावंतवाडी | फेब्रुवारी ०२, २०२३

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथून एका फरार आरोपीला गोव्यातील मडगाव येथे अटक करण्यात आली. या संशयिताला तब्बल आठ महिन्यांच्या कालावधीनंतर मडगाव रेल्वे स्थानक परिसरात अटक करण्यात आली आहे. त्याला आता सावंतवाडी पोलीसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती मडगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली.

नाईक यांनी सांगितले, सावंतवाडी येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली सावंतवाडी पोलीसांनी अटक केल्यावर त्यांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या प्रमोद मधुकर परब (वय ४८, पाडसे कुडाळ) या संशयिताला तब्बल आठ महिन्यांच्या कालावधीनंतर आज मडगाव रेल्वे स्थानक परिसरात अटक आम्हाला यश मिळाले. या संशयिताविरोधात सुनावणी चालू असताना २४ मे २०२२ रोजी तो पोलीस कोठडीतून फारार झाला होता. त्यानंतर मडगाव येथे स्टेशन रोड परिसरात तो रस्त्यावरच रहात होता आणि हमालीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page