
संगमेश्वर /दिनेश अंब्रे – शिवसेना संगमेश्वर तालुका आयोजित श्रावण महोत्सव संगमेश्वर पारंपारिक कोकणी महिला लोकनृत्य स्पर्धेमध्ये संगमेश्वर नावडीच्या अमृता ग्रुपने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. श्रावण महोत्सव पारंपारिक कोकणी महिला लोकनृत्य स्पर्धा रविवार दि. 27 जुलै देवरुख येथे मराठा भवन हॉलमध्ये संपन्न झाली.
या स्पर्धेमध्ये मंगळागौर, टिपरी नृत्य, शेतकरी नृत्य, जाखडी, नमन, शेतकरीनृत्य, आदिवासी नृत्य, समई नृत्य परात नृत्य, वारी नृत्य असे वेगवेगळे प्रकारचे नृत्य घेऊन संपूर्ण तालुक्यातून महिला तेथे उपस्थित होत्या. या स्पर्धेसाठी संपूर्ण तालुक्यातून 22 गट वेगवेगळ्या गावातून आलेले होते.संगमेश्वर नावडीच्या अमृता ग्रुपने यामध्ये 21 प्रकारच्या वेगवेगळ्या फुगड्या आणि 33 वेगवेगळे मंगळागौरीचे प्रकार असे मिळून 54 प्रकार तेथे सादर केले.
यामध्ये संगमेश्वर च्या महिला अमृता कोकाटे, सुविधा शेट्ये, सविता हळदकर, जानवी चिंचकर, आर्या मयेकर, नम्रता शेट्ये, सानिका कदम, सुप्रिया कदम, नयना शेट्ये,अर्पिता शेरे, संगीता जंगम या महिलांनी आपल्या कला सादर केल्या.

नृत्य सादरीकरणासाठी मंगळागौर गायन कु.आर्या राहुल कोकाटे हिने केले.तबला वादक गिरीराज लिंगायत, पेटीवादक यश जट्यार , शिवम भोसले, घुंघूर वाद्य ईश्वरी माईन या सर्वांनी खूप छान साथ दिली. तालुक्यातून 22 गट आणि खूप अटीतटीच्या स्पर्धेतून या महिलांनी तृतीय क्रमांक प्राप्त केल्यामुळे संगमेश्वर मधून या महिलांचे खरंच कौतुक होत आहे.
संसार करून संध्याकाळचे दोन तास वेळ काढून प्रॅक्टिस करणं, घर सांभाळून, मुलांचं शिक्षण, घरची जबाबदारी यामधून वेळ काढून या महिला उत्स्फूर्तपणे भाग घेतात. यासाठी त्यांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर