
नवी मुंबईत एनसीबीनं अमली पदार्थ माफियांचा पर्दाफाश करत चार जणांना अटक केली. या कारवाईबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवी मुंबईच्या एनसीबी टीमचं कौतुक केलं.
बनवी मुंबई: ‘नशामुक्त भारत’ या अभियानाअंतर्गत, नवी मुंबईत एनसीबीनं सुमारे २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईतून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश झाल्यानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनसीबीच्या कारवाईचं कौतुक केलं आहे.
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेट…
एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटच्या माहितीनुसार विदेशातील लोकांचा एक ग्रुप नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेट चालवत असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यानुसार एनसीबीच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. यामध्ये जप्त केलेले अमली पदार्थ कुरिअर आणि इतर मार्गांनी अमेरिकेतून आणण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाला पाठवल्या जाणाऱ्या पार्सलमधून २०० पॅकेट कोकेन एनसीबीनं नवी मुंबईतून जप्त केले.
जानेवारीच्या सुरुवातीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकानं मुंबईतील एका आंतरराष्ट्रीय कुरिअर एजन्सीचं एकदेखील जप्त केलं होतं. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोकेन होते. ते पार्सल ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात येणार होते. ड्रग्जच्या नेटवर्कमध्ये प्रत्येक आरोपीची मर्यादित भूमिका होती. त्यामुळे ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश करणं आव्हानात्मक काम होते.
२०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
एनसीबीनं ३१ जानेवारीला नवी मुंबईतून ११.५४ किलो असे उच्च दर्जाचे” कोकेन, हायड्रोपोनिक वीड आणि २०० पॅकेट (५.५ किलो) गांजा जप्त केला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. या टोळीतील सदस्यांनी त्यांच्या दैनंदिन संभाषणात त्यांच्या अमली पदार्थांच्या व्यवहारांसाठी बनावट नावांचा वापर केला होता. त्यांच्याकडून जवळपास २०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. एनसीबीचे मुंबई झोनल युनिटचे आरआर एस. अमित घावटे यांनी ही माहिती दिली. या कारवाईबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या टीमचं अभिनंदन केलं.
एनसीबी टीमचं अभिनंदन-अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटलं, “भारतानं अमली पदार्थाच्या तस्करीबाबत शून्य सहनशीलता दाखविली आहे. मुंबईत उच्च दर्जाचे कोकेन, गांजा आणि गांजा जप्त करून आणि चार जणांना अटक करून एक मोठे यश मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रग्जमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. या प्रचंड यशाबद्दल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो टीमचे अभिनंदन.”