*अमेरिका-* अमेरिकेत ५ नोव्हेंबरला होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला ७५ दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. शिकागो येथे आयोजित डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शन (डीएनसी) च्या शेवटच्या दिवशी २५ हजार लोकांना संबोधित करताना उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आणि त्यांना निष्काळजी व्यक्ती म्हटले आहे. बेजबाबदार ट्रम्प यांना पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये आणण्याचे परिणाम अत्यंत गंभीर असतील, असा इशारा त्यांनी दिला. ट्रम्प यांनी २०२० च्या निवडणुकीचे निकाल बदलण्याचा प्रयत्न केला, त्यांनी हिंसाचाराला चिथावणी दिली. कमला म्हणाल्या की, मी सर्व अमेरिकन नागरिकांना राष्ट्राध्यक्ष होण्याचे वचन देते. देशाला पुढे नेण्यासाठी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. देशाला जोडणारी मी राष्ट्रपती होईन. एक राष्ट्रपती जो वाचू,ऐकू शकतो, राष्ट्रपती ज्याला कॉमन सेन्स असेल.
छायाचित्र शिकागो येथील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाचा आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उपाध्यक्षपदाचे ६० वर्षीय उमेदवार टिम वॉल्झ, कमला हॅरिस यांची बहीण माया यांची नात लीला हिच्यासोबत खेळत आहेत. मायाची मुलगी मीनाच्या दोन मुली, लीला आणि अमरा यांनी अधिवेशनात हजेरी लावली.
कमलांचे हल्ले, ट्रम्प यांचा पलटवार..
कमला हॅरिस यांनी आपल्या भाषणात ट्रम्प यांना बेजबाबदार व्यक्ती म्हटले. त्याच्या उत्तरात ट्रम्प म्हणाले, कॉमरेड कमला हॅरिस यांच्यावर निष्पक्ष टीका करण्यासाठी तयार होत आहे. कमलांकडून आपले कुटुंब आणि लहानपणीचा उल्लेख केल्याबद्दल ट्रम्प म्हणाले, लहानपणीच्या एवढ्या गोष्टी? आपल्याला सीमा, महागाई आणि गुन्ह्यासारख्या मुद्द्यांवरही बोलायचे आहे. हॅरिस यांनी भाषणात युक्रेन व नाटोला समर्थन दिले आणि सांगितले की, रशियात युक्रेन आणि नाटो सहकाऱ्यांसोबत उभी राहीन. ट्रम्प यांनी बचावात सांगितले की, नाटो बिल पेमेंट करत नव्हता. जवळपास प्रत्येक देशावर थकबाकी होती. तुम्ही पेमेंट करत नसाल तर आम्ही बाहेर जाऊ. अमेरिका मूर्ख ठरणार नाही. यानंतर पैसा आला आणि मी नाटोला वाचवले. कमला हॅरिस म्हणाल्या, मी हुकूमशहासोबत राहणार नाही. ट्रम्प म्हणाले, हुकूमशहा त्यांच्यावर हसत आहेत. त्या निष्प्रभ राहतील. कमला म्हणाल्या, त्या इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकारासोबत उभ्या राहतील. ट्रम्प म्हणाले, त्या इस्रायलचा द्वेष करतात. यामुळे इस्रायलवर हल्ला झाला.
ज्येष्ठ डेमोक्रॅट नेते म्हणाले, अति आत्मविश्वास टाळा..
अधिवेशनापर्यंत कमला यांची ट्रम्पपेक्षा २% आघाडी होती, तर जुलैच्या सुरुवातीस त्या ट्रम्पपेक्षा ५ गुणांनी मागे होत्या. मात्र पक्षाचे नेते अजूनही आत्मसंतुष्टतेचा इशारा देत आहेत. आपण कोणाशी स्पर्धा करत आहोत हे विसरू नये, असा इशारा मिशेल ओबामा यांनी दिला. जॉर्जियाचे सिनेटर राफेल वॉर्नॉक म्हणाले की, आतापर्यंत आमच्यात उत्साहाचा अभाव होता. आपण उत्साही आहोत पण अतिआत्मविश्वास टाळावा लागेल