अंबडला आज ओबीसी एल्गार सभा:शंभर एकरांचे विस्तीर्ण मैदान; छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडेंची उपस्थिती….

Spread the love

प्रतिनिधी/जालना/ जनशक्तीचा दबाव- मराठा समाजाला ओबीसी प्रर्वगातून आरक्षण देऊ नये, जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागण्यांसाठी शुक्रवारी अंबड येथे ओबीसी एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जवळपास शंभर एकरांवर होणाऱ्या या सभेसाठी चारशे एकर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून राज्यभरातून जवळपास १० लाख ओबीसी बांधव या सभेला हजर राहतील, असा दावा संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

अंबड शहरातील पाचोड रोडवर असलेल्या धाईतनगर येथे शुक्रवारी ११ वाजता ही सभा होणार आहे. त्यासाठी ११० एकरांवर मैदान तयार करण्यात आले असून येथे २० फूट रुंद आणि ३० फूट लांबीचे सहाशे चौरस फुटांचे व्यासपीठ उभारण्यात येत आहे. या व्यासपीठावर प्रमुख निमंत्रित असणार आहेत. यात मंत्री छगन भुजबळ हे प्रमुख मार्गदर्शन करतील, तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, महादेव जानकर, जयदत्त क्षीरसागर आदी नेतेही उपस्थितांना मार्गदर्शन करतील. शिवाय मुख्य व्यासपीठाच्या शेजारीच एक दुसरे व्यासपीठ उभारण्यात आले असून त्यावर राज्यभरातून आलेले ओबीसी समाजाचे प्रमुख मान्यवर असणार आहेत. अंबड तालुका ओबीसी व भटक्या समाजाच्या वतीने या सभेचे संयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधव आपले योगदान देत आहेत. सभेला होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सभेच्या एक दिवस अगोदरच बंदोबस्ताची पूर्वतयारी करण्यात आली. त्याशिवाय सहा मोठे वाहनतळं उभारण्यात आले असून सभेच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक रस्त्यासाठी त्याच मार्गावर वाहनतळ देण्यात आले आहे.

🔸️३ लाख पाण्याच्या बाटल्या, १० टँकरची व्यवस्था….

सभेच्या ठिकाणी दोन लाख पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था तर सभेच्या बाहेर ३ लाख पाणी बाटल्या संयोजकांकडून ठेवण्यात आल्या आहेत. त्याशिवाय १२ हजार लिटरचे १० टँकर संयोजकांनी आणून उभे केले आहेत.

🔸️पाच प्रमुख मार्गांवर बदल…..

ओबीसी सभेच्या अनुषंगाने पाच प्रमुख मार्गांवर बदल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात शहागड-अंबडमार्गे जालन्याकडे येणारी वाहतूक वडीगोद्री समोरील उड्डाणपूल, शहागड, पाचोड-किनगाव चौफुलीमार्गे जालन्याकडे जाणार. जालना-अंबडमार्गे शहागडकडे येणारी वाहतूक जालना-गोलापांगरी-पारनेर फाटा, किनगाव चौफुली-जामखेड फाटा मार्गे पाचोड-वडीगोद्री-शहागडकडे जाईल. घनसावंगी-अंबडमार्गे जालन्याकडे येणारी वाहतूक सूतगिरणी चौफुलीमार्गे राणी उंचेगाव-जालनाकडे जाईल. पाचोड-अंबडमार्गे जालन्याकडे येणारी वाहतूक जामखेड फाटा-किनगाव चौफुलीमार्गे जालन्याकडे येईल. पाचोड-अंबड-घनसावंगी जाणारी वाहतूक पाचोड-वडीगोद्री-शहागड-तीर्थपुरीमार्गे घनसावंगीकडे जाणार आहे. ही वाहतूक १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेपासून ते रात्री ७ वाजेपर्यंत अथवा जनसमुदाय जाईपर्यंत राहणार आहे.

🔸️५१ क्विंटल पोहे, ११ क्विंटल चिवडा….

विविध गावांतील ओबीसी व भटके समाजाच्या वतीने नाष्टा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पारनेर ग्रामस्थांच्या वतीने ५१ क्विंटल पोहे, मार्डी ग्रामस्थांच्या वतीने ११ क्विंटल चिवडा व बुंदीची व्यवस्था करण्यात आली आहे. आणखी काही ग्रामस्थांनी नाष्ट्याची व पाण्याची व्यवस्था केली आहे. सभा उघड्यावर होणार असल्याने उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून पांढरा रुमाल आणि पाण्याची बाटली सोबत ठेवावी, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

🔸️१२ एलईडी व पाचशे भोंगे…

सभेसाठी १२ मोठ्या एलईडी वॉल उभारण्यात येत आहेत, तर ५०० भोंगे साउंड सिस्टिमचा भाग असेल. मोठ्मोठ्या स्पीकरचे १० पिलर उभारले आहे. तालुका समन्वयक, लहानमोठी गावे व समाजातील घटकांकडून येणाऱ्या मदतीतून कार्यक्रमासाठी खर्च केला जात असल्याचे संयोजकांनी सांगितले. असा असेल सभेचा कार्यक्रम : सकाळी ९.३० वाजता शीतल साठे व सचिन माळी यांचा प्रबोधनपर शाहिरी जलसा होईल. ११ वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. यात मंत्री छगन भुजबळ हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. भटक्या समाजातील बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी होतील.

🔸️असे आहेत वाहनतळ :

▪️शारदानगर : जालना, परभणीकडून येणाऱ्या वाहनांसाठी अंबड बाजार समिती मैदान : देऊळगावराजा, बुलडाण्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी मार्केट फेडरेशन : बीड मार्गे येणाऱ्या वाहनंासाठी तंत्रनिकेतन

▪️पाचोड रोड : संभाजीनगर, पैठण, पाचोड मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी राम लांडे यांची प्लॉटिंग : बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, किनगाव चाैफु

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page