
RTE Admission:’आरटीई’अंतर्गत प्रवेशासाठी पालकांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १ मार्चपासून सुरू झाली होती. त्यासाठी १७ मार्चपर्यंत मुदत असून, राज्यभरातून या प्रवेशप्रक्रियेला पालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दहा दिवसांतच या प्रवेशांसाठी राज्यभरातून एक लाख एक हजार ९६९ जागांसाठी दोन लाखांवर प्रवेश अर्ज दाखल झाले आहेत.
दबाव : प्रतिनिधी बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण (आरटीई) प्रवेशप्रक्रियेत अर्ज दाखल करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत आता पर्यायी लिंकची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्य पोर्टलवरील लिंकवरून अर्ज दाखल करण्यात अडचणी येत असल्यास पालकांना या लिंकवरून अर्ज दाखल करता येणार असल्याचे शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
आरटीई’अंतर्गत प्रवेशासाठी पालकांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १ मार्चपासून सुरू झाली होती. त्यासाठी १७ मार्चपर्यंत मुदत असून, राज्यभरातून या प्रवेशप्रक्रियेला पालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दहा दिवसांतच या प्रवेशांसाठी राज्यभरातून एक लाख एक हजार ९६९ जागांसाठी दोन लाखांवर प्रवेश अर्ज दाखल झाले आहेत.
राज्यभरातून सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे मूळ पोर्टलवरील अर्ज दाखल करण्याच्या student.maharashtra.gov.in लिंकला अनेक समस्या येत होत्या. ही समस्या लक्षात घेऊन साइट संथ असल्यास पुन्हा अर्ज भरण्याचा प्रयत्न करण्याची सूचनाही शिक्षण विभागामार्फत देण्यात आली होती. परंतु, गेल्या काही दिवसांत समस्या अधिकच वाढल्याने अनेक पालकांनी पैसे खर्च करून इंटरनेट कॅफेमध्ये अर्ज भरण्यास प्राधान्य दिले.
या समस्यांमुळे वैतागलेल्या पालकांनी ही सुविधा सुरळीत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आरटीई प्रवेश अर्जांसाठी rte25admission.maharashtra.gov.in ही पर्यायी लिंकही उपलब्ध करून देण्यात आली आहे. १७ मार्चला मध्यरात्री बारा वाजेपर्यंत पालकांना मूळ पोर्टल किंवा नव्याने उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर अर्ज दाखल करता येणार आहे.