नेरळ-सुमित क्षिरसागर युवा नेतृत्व असलेल्या तरुणांचा कल हा राष्ट्रवादी पक्षाकडे झुकलेला दिसत आहे.त्यामुळेच की काय राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे आणि तालुका अध्यक्ष भगवान चंचे यांच्या कामावर खुश होऊन तरुण राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करीत आहेत,नेरळ पूर्व परिसरातील असंख्य तरुणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. लोकनेते सुधाकर घारे यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून विकासकामे केली जात आहेत, तसेच तरुणांना भेडसावणारे अनेक प्रश्न सुधाकर घारे व प्रमुख पदाधिकारी यांच्या माध्यमातून सोडविले जात आहेत. त्यामुळे सुधाकर घारे तरुणांसाठी प्रमुख आकर्षण बनले आहेत. मौजे नेरळ पुर्व परिसरातील असंख युवा नेतृत्व करणाऱ्या तरुणांनी राष्ट्रवादीच्या सोबत असल्याचा दावा केला असून पक्ष प्रवेश केला.यावेळी युवा नेतृत्व अध्यक्ष अनुराग राजू आढाव नलीन राजेश पेणकर प्रल्हाद संजय दास तुषार सोनार शुभम शिंदे बंटी पेमारे सचिन परदेशी प्रतीक जाधव संदेश शर्मा ओमकार खेडकर राहुल राणे विष्णु दास कैलास शिंगे संजय नारायण दळवी अमित जाधव रोहित पगारे सुरज कडाव या प्रसंगी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केला. याप्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवर तालुका अध्यक्ष भगवान शेठ चंचे,नेरळ शहर धनाजी गरुड,दिलीप कराळे आदी मान्यवर उपस्थित होते.