
संगमेश्वर – अचिता कोकाटे- संगमेश्वर मधील रामपेठ येथे पुर्ण प्राथमिक केंद्र शाळा नंबर दोन येथे सकाळच्या सत्रात ओम साई गणेश मित्र मंडळ सांताक्रूझ मुंबई यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले .
कार्यक्रमाला मान्यवर म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन शेरे उपस्थित होते तसेच माता पालक संघाचे सदस्य उपस्थित होते. त्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्नेहा भिडे यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तसेच ओम साई मित्र मंडळाचे अध्यक्ष सुधीर माने, सेक्रेटरी सतीश सावंत.खजिनदार नरेश सुवारे.महिला सदस्या सुवारे मॅडम यांचा शिक्षीका रत्नप्रभा शेरे.चोचे.व रेखा जाधव यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले .


पहिली ते चौथी च्या मुलाना शालेय साहित्य वह्या पेन रंग साहित्य व तक्ता खाऊ इत्यादींचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे महिला व पुरुष असे बतिस कार्यकर्ते मुंबईतील नालासोपारा विरार इत्यादी परिसरातून आले होते अध्यक्ष सुधीर माने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे बारा वर्षात गरजु व्यक्ती तसेच मानव कल्याण जेष्ठ नागरिकांसाठी कमी दरात व काही ना मोफत गाणगापूर पंढरपूर देहू आळंदी शिडी येथे तिथकात्रा काढून देव दर्शन मुल दत्तक घेणे व जिवन उपयोगी साहित्याचे वाटप इत्यादी उपक्रम राबविले आहेत संगमेश्वर परिसर रमणीय व निसर्गरम्य वाटला .

हाच सुंदर उपक्रम नावडी येथे सामाजिक कार्यकर्ते व वरीष्ठ पत्रकार दिनेश आंब्रे यांच्या प्रयत्नातून संपन्न झाला .उपस्थित सर्वांचे आभार शिक्षीका रेखा जाधव यांनी मानले..