‘अक्षरयात्रा’ पुस्तकाचे पुणे पुस्तक महोत्सवात प्रकाशन…खा . सुप्रिया सुळे , आयोजक राजेश पांडे यांची उपस्थिती…जे . डी . पराडकर यांचे लेखन..

Spread the love

संगमेश्वर:- पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पटांगणात १६ ते २४ डिसेंबर दरम्यान भरलेल्या पुस्तक महोत्सवाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला .

आज पुस्तक महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी कोकणच्या संगमेश्वरचे लेखक जे . डी . पराडकर यांच्या चपराक प्रकाशित अक्षरयात्रा या पुस्तकाचे प्रकाशन खा. सुप्रिया सुळे , पुस्तक महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे , मिलींद मराठे , भालचंद्र कुलकर्णी , लेखक जे . डी . पराडकर , चपराकचे संपादक घनश्याम पाटील , अरुण कमळापूरकर , जयंत पराडकर आदि मान्यवर उपस्थित होते .

लॉकडाऊनच्या कालावधीत १०० दिवसात जे . डी . पराडकर यांनी विविध विषयांवर सलग १०० लेख लिहीले होते . यातील निवडक ६४ लेखांचा समावेश अक्षरयात्रा या पुस्तकात करण्यात आला आहे . प्रसिध्द लेखक समीर गायकवाड यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहीली आहे .

या पुस्तकाचे मुखपृष्ठ चित्रकार विष्णू परीट यांनी साकारले असून २५६ पानांचे हे पुस्तक पुठ्ठाबांधणी स्वरुपाचे आहे . मूळ किंमत ४०० रुपये असली तरीही संपादक घनश्याम पाटील यांनी हे पुस्तक वाचकांसाठी ३०० रुपयात उपलब्ध करुन दिले आहे . चपराक प्रकाशन ७०५७२९२०९२ या नंबरवर ३०० रुपये गूगल पे करुन त्याचा स्क्रीनशॉट आणि पत्ता पाठवल्यानंतर अक्षरयात्रा पुस्तक घरपोच मिळणार आहे .

अक्षरयात्रा पुस्तक विक्रम करेल

कोकणचे लेखक जे . डी . पराडकर यांच्या लेखनात मोठी ताकद आहे . त्यांनी केलेले वर्णन डोळ्यासमोर उभे रहाते . चपराकने अक्षरयात्रा हे त्यांचे प्रकाशित केलेले पाचवे पुस्तक आहे. आज पुणे पुस्तक महोत्सवात अक्षरयात्राचे प्रकाशन झाले ही चपराकसाठी आनंदाची बाब आहे .
प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी पुस्तकाला वाचकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने हे पुस्तक नक्कीच विक्रम करेल असा विश्वास चपराक प्रकाशनचे संपादक घनश्याम पाटिल यानी व्यक्त केला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page