अजितदादांचा मुलगा पार्थ लोकसभा लढवणार; ‘या’ मतदारसंघावर झाले शिक्का मोर्तब…

Spread the love

पुणे :- येत्या काही महिन्यात लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरूवातही केली आहे. विविध पक्षांकडून अंतर्गत सर्व्हे केले जात आहेत. कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार असणार? यावर पक्षात चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै महिन्यात दोन गट पडले. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार दोन्ही गटाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा मुलगा पार्थ पवार लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहे. त्यांच्यासाठी मतदारसंघावरही शिक्कामोर्तब झाले आहे.

पुणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ आहे. पुणे, बारामती आणि शिरुर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला कोणता मतदार संघ येणार आहे, त्यावर चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार महायुती सरकारमध्ये सामील झाल्यामुळे त्यांच्याकडे बारामती किंवा शिरुर लोकसभा मतदारसंघ जाण्याची शक्यता आहे. बारामतीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे २००९ पासून सातत्याने निवडून येत आहे. १९९६ पासून २००४ पर्यंत शरद पवार यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. आता या ठिकाणी पार्थ पवार उभे राहिल्यास सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याशी त्यांना थेट लढत द्यावी लागणार आहे.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीत फूट, निवडणूक आयोगाकडून जाहीर; जयंत पाटील म्हणाले, निवडणूक आयोग अयोग्य…

पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यासाठी अजित पवार गटाने मधला मार्ग काढला आहे. बारामतीमधून सरळ सुप्रिया सुळे यांच्याशी लढत केल्यास एकाच कुटुंबातील दोन उमेदवारांची ती लढत होणार आहे. त्याऐवजी पार्थ पवार यांना शिरुर मतदारसंघातून उभे करण्याची तयारी चालवली जात आहे. शिरुर मतदार संघावर अजित पवार यांचे वर्चस्व आहे. या मतदारसंघात शिरूर विधानसभा आमदार अशोक पवार वगळता सर्व आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात आंबेगाव, खेड, हडपसर, जुन्नर आणि भोसरी मतदारसंघ येतात. शिरुरचे आमदार अशोक पवार याच मतदारसंघातील आहेत. फक्त ते अजित पवार यांच्यासोबत नाही. परंतु दिलीप वळसे-पाटील, दिलीप मोहिते-पाटील, चेतन तुपे, अतुल बेनके हे अजित पवार समर्थक आहे. यामुळे शिरुर मतदारसंघ पार्थ पवार यांच्यासाठी सुरक्षित असणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page