देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील ओझरेबुद्रुक बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी आमदार शेखर निकम यांनी सर्वांच्या साथीने विकास कामे मार्गी लावू असा शब्द दिला.
प्रवेशकर्त्यांमध्ये मनोज कांबळे, मंगेश कांबळे, सुशांत कांबळे, काशिराम कांबळे, महेंद्र पवार, जनार्दन कांबळे, अजय कांबळे, अनिकेत जाधव, दीपक कांबळे होते. सर्वांचे आमदार शेखर निकम यांनी पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी किशोर सावंत, जितेंद्र शेट्ये, सचिन कदम, नितीन भोसले, मुरादपूरचे माजी सरपंच मंगेश बंडागळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.