पाडापाडीचे राजकारण केले तर याद राखा; मेळाव्यात अजित पवारांची पदाधिकाऱ्यांना तंबी

Spread the love

धुळे – उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या कमी झाल्याची नाराजी व्यक्त करीत, आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. पाडापाडीचे राजकारण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी तंबी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे.

जातीय दंगली घडवून पुरोगामी महाराष्ट्रात धर्मांधर्मात पसरविणाऱ्या भाजप सरकारला सत्तेतून बाहेर करण्यासाठी आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार निवडून द्यावे, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे केले. दोंडाईचा शहरातील केशरानंद नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले. भाजप जातीय दंगली घडवून महागाई, बेरोजगारी, विकासाच्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करत असल्याचा आरोपदेखील यावेळी त्यांनी केला.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार ज्यावेळेस एक वर्षांपूर्वी गद्दारी करून आणल्यात गेले. त्यात पन्नास खोके एकदम ओके. महाराष्ट्राला याच्या आधी ५० कोटी एकदम मुख्य माहिती नव्हतं ते कोणी माहिती करून दिलं.? तर या गद्दारांनी करून दिले. धुळे नंदुरबार जिल्ह्यातून एकही आमदार नाही, असे चालणार नाही. दोन्ही जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार मिळाले पाहिजे. पुन्हा एकदा हे उलट्या पायाचे सरकार आपल्याला बाजूला करायचे आहे.

महाविकास आघाडीचे सरकारचा दोन वर्ष कार्यकाळ झाला असताना शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांनासोबत घेऊन बंड केले. भाजपच्या मदतीने त्यांनी बंड करून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आणले. यावर परत एकदा अजित पवार यांनी टीका केली. सरकार व्यवस्थित चालू असताना का केले. कोणाचे काय चुकले असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केला. एकनाथराव शिंदे मुंबईतून सुरतला गेले. सुरतवरून गोव्याला तिथून आले. परत मुंबईला आले, अरे तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व करायला निघाला अशा पद्धतीने असे काय घडले होते, कुणाचे काय चुकले होते. अचानक नवीन सरकार स्थापन करावे लागले, असेही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारविरोधात बोलताना सांगितले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page