संगमेश्वर : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अजित नारकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.त्यांच्यासोबत पडवे गावचे गावप्रमुख दत्ताराम ठुकरूल, पडवेच्या सरपंच रूची बाणे, राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला.
दरम्यान, संगमेश्वर तालुक्यातील डिंगणीचे सरपंच समिरा अ. मजीद खान यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अजीम उमर खान, अर्पिता मंगेश काष्टे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनीही सिंधुरत्न समृद्ध योजनेचे कार्यकारी समितीचे सदस्य किरण ऊर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
जाहिरात