बुलढाणा- जळगाव जामोद शहरातील भारतीय वायुसेना बंगलोर येथील मेडिकल ट्रेनिंग सेंटर कम्युनिकेशन टेक्निशियन या पदावर कार्यरत असलेले मिथिल दिलीपराव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. हुतात्मा मिथिल देशमुख यांच्यावर वाडीखुर्द या त्यांच्या गावी शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यापूर्वी मिथिल देशमुख यांच्या पार्थिवाची शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. शहरातील हिंदू स्मशानभूमी येथ वायुसेनेतील अधिकारी व बटालियन मधील जवानांनी 30 राउंड फायर करीत त्यांना मानवंदना दिली. याप्रसंगी त्यांना वायुदल तथा पोलीस प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव गवळी, तहसीलदार शितल सोलाट, ठाणेदार दिनेश झांबरे, सोनाळा ठाणेदार सागर भास्कर, नायब तहसिलदार मार्कन्ड यांचेसह पोलीस विभाग व वायुदलाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती हाेती. त्याशिवाय शहर व परिसरातील विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकारी आणि हजारो नागरिक उपस्थित हाेते.