मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्यसरकारच्या शिष्टमंडळाची बैठक संपन्न; आज दु. २ वा. मनोज जरांगे मोठी घोषणा करणार

Spread the love

नवीमुंबई- मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. लाखो मराठा बांधवांसह राजधानी मुंबईत धडकल्यानंतर मनोज जरांगे मराठा बांधवांसह मुंबईतील आझाद मैदानात जाण्यावर ठाम होते. मात्र त्याआधी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत राज्य शिष्टमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणावर सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत आज दु. २ वा. जरांगे पाटील नवीमुंबईतील वाशी येथे सभा घेऊन पुढील भुमिका स्पष्ट करणार आहेत.

सरकारसोबत आज मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे शिष्टमंडळ तसेच वकिलांसोबतही चर्चा केली. या चर्चेनंतर वाशीच्या छत्रपती शिवाजी नगर चौकात सभा घेत जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरील सरकारने काढलेला जीआर वाचून दाखवला. आपल्याला काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करायची आहे. सरकारने काही कागदपत्रे दिली आहेत, ते वाचून दाखवणार आहे. झालेल्या घटना तुम्हाला सांगायच्या आहेत. आता आपण मोकळं माघारी जाणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सर्वांना आवाज गेला पाहिजे, गैरसमज नको म्हणत साऊंड सिस्टिमची व्यवस्था झाल्यानंतर २ वाजता याबाबत जाहीर सभेत घोषणा करणार असल्याचेही जरांगेंनी सांगितले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page