मुंबई – राज्य सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. बहिणीनंतर आता भावांसाठीही एक योजना राबवली आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली आहे. याच योजनेला लाडका भाऊ योजना असं संबोधण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत मुलांना शिकता शिकता किंवा बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत मुलांसाठी रोजगार निर्माण होणार आहे. या योजनेसाठी तुम्हालाही अर्ज येणार आहे.
राज्यातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत १२ वी पास तरुणांना ६००० रुपयांचा रोजगार निर्माण केला जाणार आहे. १२वी पास आणि डिप्लोमा केलेल्या तरुणांना ८००० तर ग्रॅज्युएशन आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण असलेल्या तरुणांना १०,००० रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत तरुणांचे कौशल्य वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
योजनेचा फायदा
* लाडका भाऊ योजनेअंतर्गत तरुणांना १ वर्षाची अप्रेंटिसशिप करावी लागणार आहे.
* या कालावधीत तरुणांना स्टायपेंड म्हणजेच विद्यावेतन ८,००० ते १०,००० रुपये दिले जाणार आहे.
* या योजनेद्वारे दरवर्षी १० लाख तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. लाभार्थ्यांनी अप्रेटिंसशिप पूर्ण केल्यानंतर त्याच कंपनीत नोकरीसाठीही अर्ज करु शकतात.
योजनेसाठी पात्रता
* या योजनेसाठी १८ ते ३५ वयोगटातील तरुण अर्ज करु शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी १२वी पास असणं गरजेचे आहे. तरुणांनी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदार तरुणाचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.
योजनेसाठी अर्ज कसा करावा?
* अर्ज करण्यासाठी तुम्हाला रोजगार महास्वंय पोर्टलवर जावे लागेल. https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या लिंकवर जावे लागेल.
* यानंतर तुम्हाला स्वतः ला रजिस्टर करावे लागेल. यासाठी मोबाईल आणि ओटीपी टाकावा लागेल.
* यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म भरा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
* यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशनचा ओटीपी येईल. हा ओटीपी संबंधित ठिकाणी भरा. यानंतर अर्ज भरा.