बांगलादेशमध्ये सत्तांतर, नोबेल विजेते मोहम्मद यूनुस यांनी स्थापन केले हंगामी सरकार..

Spread the love

बांगलादेशमध्ये सत्तांतर, नोबेल विजेते मोहम्मद यूनुस यांनी स्थापन केले हंगामी सरकारनोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद यूनुस  हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली.

*बांगलादेशमध्ये सत्तांतर, नोबेल विजेते मोहम्मद यूनुस यांनी स्थापन केले हंगामी सरकार*

*ढाका:* बांगलादेशात सत्तांतर झाले आहे. शेख हसनी यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी देश सोडून भारतात आश्रय घेतला. त्यानंतर बांगलादेशात हंगामी सरकार स्थापण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यानुसार गुरूवारी हंगामी सरकारची स्थापना बांगलादेशात करण्यात आली आहे. बंगभवन हे बांगलादेशच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान आहे. या ठिकाणी नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद यूनुस  हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी या हंगामी सरकारला शपथ दिली. युनूस यांच्यासह 13 जणांनी ही शपथ घेतली. शपथविधीनंतर युनूस यांचे पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले आहे.

मोहम्मद यूनुल हे अर्थतज्ज्ञ आहेत. सामाजिक कार्यातही ते पुढे असतात. बांगलादेशातील गरीबी कशी कमी होईल यासाठी त्यांनी काही सुचना केल्या होत्या. त्यासाठीच त्यांना नोबेल मिळाले होते. त्यांना गरिबांचा मित्र म्हणूनही ओळखले जाते.2006 साली त्यांना नोबेल शांती पुरस्काराने गौरवले गेले होते.

यूनुस यांनी 2007 साली त्यांनी आपला राजकीय पक्षही काढला होता. नागरीक शक्ती असं या पक्षाचे नाव होते. 2008 मध्ये ते या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढणार होते. पण काही कारणांमुळे ते आणि त्यांचा पक्ष निवडणुकीला सामोरा गेला नाही. ते निवडणूक लढतील अशी त्यावेळी अपेक्षा केली जात होती.

शपथविधीसाठी मोहम्मद यूनुस हे गुरूवारी दुपारी पॅरिसवरून ढाकाला पोहोचले होते. त्यांना विमानतळावर लष्कर प्रमुख भेटले होते. त्याच वेळी सामाजिक क्षेत्रातले लोकही भेटले होते. त्यात काही विद्यार्थ्यांचाही समावेश होता. यूनुस यांनी या सर्वां बरोबर चर्चा ही केली. बांगलादेशच्या नागरिकांना चांगले सरकार देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page