छगन भुजबळ यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अजित पवार नरमले! मनधरणी करण्यासाठी तीन नेत्यांना नाशिकला पाठवणार…

Spread the love

‘जहा नहीं चैना, वहा नहीं रहाना’ या वक्तव्यावरून चर्चा सुरू असतानाच छगन भुजबळ यांनी बुधवारी येवला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि जनतेशी चर्चा करून महायुतीत राहायचे की नाही या बाबत निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. 

नाशिक /प्रतिनिधी- महायुती सरकारमध्ये मंत्रिपद डावलल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ नाराज आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात सहभागी न होता त्यांनी थेट नाशिक गाठले. या सोबतच पुढील अधिवेशनात सहभागी होणार नसल्याचं देखील छगन भुजबळ यांनी जाहीर केले. छगन भुजबळांच्या या नाराजीनंतर आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. पक्षातील नाराजी नाट्यवरून अजित पवार देखील दोन दिवस नॉट रीचेबल होते. दरम्यान, भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार तीन मोठ्या नेत्यांना नाशिकला पाठवणार असल्याची माहिती आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे छगन भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने राज्यभर आंदोलने केली जात आहे. कल पुण्यात देखील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलंन केले होते. नाशिकमध्ये आज समता परिषदेची महत्वाची बैठक होणार असून या बैठकीत राज्यभरातून पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बैठकीनंतर भुजबळ काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळात स्थान आणि पक्षात सन्मान मिळत नसल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. भूजबळांनी नाराजी व्यक्त करत, माझ्या मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते. त्यामुळे मंत्रिपदी मला कोणी डावलले याची मी माहिती घेत आहे. आपल्यासारख्या बहुजन नेत्याला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध नव्हता असे देखील भुजबळ म्हणाले होते.

भुजबळांची मनधरणी करायला ‘हे’ नेते जाणार…

छगन भुजबळ नाराज असल्याने त्याची मनधरणी करायला आता हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार अ आहेत. मात्र, हे नेते भुजबळ यांची कधी भेट घेणार या बाबत अद्याप माहिती पुढे आलेली नाही.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page