▶️पुणे l 06 एप्रिल: गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील बहुतेक जिल्ह्यांचं तापमान झपाट्यानं वाढत असल्याचं दिसून येत आहे. उन्हाळा लागला की विदर्भातील नागपूर, अकोला, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पारा ५० अंशावर पोहचतो. चंद्रपुरला तर महाराष्ट्राची हॉट सीटी म्हटलं जातं.
▶️परंतु आता एप्रिम महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात चंद्रपुरसह चक्क पुण्यातील तापमानानं चाळीशी ओलांडली आहे. दुपारच्या भरात चांगल्या उष्णतेच्या झळा बसत असल्यामुळे पुणेकर हैराण झाले आहे. त्यातच आता चंद्रपुरनंतर पुण्यात सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
▶️एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानानं चाळीशी पार केल्यामुळं पुढच्या काही दिवसांमध्ये पुण्याच्या तापमानात आणखी मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सर्वाधिक ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर पुणे शहरातील कोरेगाव पार्क ३९.५ अंश सेल्सिअस नोंद झाली आहे.
**************************
▶️जाहिरात तसेच अचूक बातम्यांसाठी*
___________________________
जनशक्तीचा दबाव मुंबई
_________________________
▶️ RNINO.MAHMAR2014/59698
———————-‐—————–
▶️https://janshaktichadabav.com/
_________________________
न्यूज च्या व्हॉट्सॲप* 🪀 *ग्रुपला जाॅईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…
_________________________
_________________________
▶️
दबाव लोकशक्तिचा निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा