20 वर्षानंतर महाराष्ट्रात सर्वात मोठी कारवाई; थेट गृहराज्यमंत्र्यांनी बारवर टाकली धाड…

Spread the love

  
नवी मुंबई /प्रतिनिधी- महाराष्ट्रात डान्सबारवर बंदी आहे. असे असताना देखील महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये छुप्यापद्धतीने डान्स बार सुरु आहेत. डान्स बार विरोधात महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबईतील डान्स बारवर थेट गृहराज्यमंत्र्यांनी धाड टाकली आहे.

महाराष्ट्रात डान्सबारवर बंदी आहे. असे असताना देखील महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये छुप्यापद्धतीने डान्स बार सुरु आहेत. डान्स बार विरोधात महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबईतील डान्स बारवर थेट गृहराज्यमंत्र्यांनी धाड टाकली आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबईतील वाशी इथल्या अनधिकृत डान्स बारवर धाड टाकली.  ‘द रेस’ अस या डान्सबारचे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बार वर धाड टाकली.  या बारमध्ये तोकड्या कपड्यांमध्ये बारगर्ल अश्लिल नृत्य करत असल्याचे दिसून आले. यावेळी 40 बारगर्ल आणि 6 वेटर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे डान्स बार सुरु असतील तर ते तातडीने बंद करावेत. अन्यथा कडक करावाई केली जाईल अशा इशारा देखील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला आहे.  2005 मध्ये माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महाराष्ट्रातील डान्स बार बंद केले.  आर. आर. पाटील यांनी असाच प्रकारे डान्सबार छापेमारी केली होती.  डान्सबारमुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे. यामुळे कायद्याने डान्स बारवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे डान्स बार सुरु आहेत.

*नालासोपारा येथे 48 लाखांचे ड्रग्ज हस्तगत…*

नालासोपाराच्या प्रगती नगरातून 240 ग्राम वजनाचा एम, डि, मेफेड्रोन  नावाचा ड्रग नायझेरिअन नागरिकांकडून जप्त करण्यात आला आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. बेन जोसेफ औनुमेरे एज़ीवगो (46) जॉन ओकाफोर (31) फेवर फ़िबी यूसुफ (36) असे या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल 48 लाख 24 हजाराचा मेफेड्रोन  ड्रग तुळींज पोलिसांनी पकडला आहे. पोलिसांच्या कारवाईत त्यांच्याकडे भारत देशात वास्तव्य करण्याकरिता आवश्यक असलेलं पारपत्र व व्हिसा आढळून आले नाही. ते नालासोपाराच्या अंशित प्लाझा घर क्रमांक 203 या इमारतीमध्ये राहत होते. त्यांना राहण्यासाठी देण्यात आलेल्या घर मालकावर तसेच घर दाखवणाऱ्या एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page