
दिव्यातील नागरिकांच्या सुखसमृद्धीसाठी प्रभु श्रीरामचंद्रांची महाआरती – सौ.दर्शना चरणदास म्हात्रे
दिवा (प्रतिनिधी) राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या सुखसमृद्धीसाठी ज्याप्रकारे आज अयोध्येच्या दौऱ्यावर जावून शरयु नदीच्या काठी प्रभु श्री राम लल्लाची आरती केलीय,अगदीच त्याच धर्तीवर दिव्यातील नागरिकांच्या सुख आणि समृद्धीसाठी आज दातिवली तलाव येथे शिवसेनेतर्फे महाआरतीचे आयोजन करण्यात आल्याच्या प्रतिक्रीया ठामपाच्या माजी नगरसेविका सौ.दर्शना चरणदास म्हात्रे यांनी दिल्या आहेत.यावेळी कु.साक्षी मढवी यांनी उपस्थित सर्व महिलांचे आभार मानले.
आज सायंकाळी जसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येला जावून शरयु नदीच्या काठी महाआरती केली.त्याच वेळेत दिव्यातील 3 हजार महिलांनी दिव्यातील दातिवली तलावाच्या शेजारी ऐतिहासिक महाआरतीचे आयोजन केले होते.यावेळी बोलताना माजी नगरसेविका सौ.दर्शना म्हात्रे म्हणाल्या की,खरचं आज खुप आनंदाचं वातावरण आहे. सर्व महिलांनी महाआरतीला उपस्थित राहून खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला.त्यामुळे जमलेल्या महिलांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आम्ही मनापासून आभार मानते.

या महाआरती दिव्यातील महिलांनी उत्सफुर्त असा प्रतिसाद दिला.दिव्यात लाऊडस्पीकरच्या आवाजाने वातावरण भक्तीमय झाले होते.फटाक्यांच्या आतषबाजीने आरतीची सुरवात करण्यात आली.जवळजवळ एक तास महाआरती झाली.जय श्रीराम, जय हनुमान, हिंदु धर्माचा,सनातन धर्माचा विजय असो अश्या घोषणा देवून परिसर भाविकांनी आनंद साजरा केला.
या ऐतिहासिक महाआरतीला माजी नगरसेविका सौ.दर्शना चरणदास म्हात्रे,माजी.नगरसेविका सौ.दिपालीताई उमेश भगत,माजी नगरसेविका सौ.सुनिताताई गणेश मुंडे,सामाजिक कार्यकर्त्या सौ.अर्चना निलेश पाटील,शिवसेना युवतीप्रमुख कु.साक्षी रमाकांत मढवी, सौ.सुप्रिया आदेश भगत, सौ.सरिता मढवी, सौ.ज्योती दिपक जाधव आदी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
