![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230328-WA0022-1.jpg)
मुंबई : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का मिळाला आहे.महाराष्ट्र बार कौन्सिलने सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द केली आहे. दरम्यान, यापूर्वीच बार कौन्सिलने सदावर्तेंविरोधात सुरू केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. तुम्ही वकील आहात म्हणून तुम्हाला विशेष वागणूक मिळणार नाही. तसेच, बार कौन्सिलविरुद्ध काहीही बोलायला मुभा देणार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सदावर्ते यांना सुनावलं होतं.
पेशाने वकील असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ॲड. सुशील मंचेकर यांनी याबाबत महाराष्ट्र बार काउंन्सिलकडे तक्रार केली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात 7 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बार कौन्सिलने सदावर्तेंविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू केली. यानंतर ही कारवाई राजकीय हेतून प्रेरित असल्याचा दावा करत सदावर्तेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.