ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग)
▪️ बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे साहेब (मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या आदेशाने, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व कल्याण जिल्हा प्रमुख श्री.गोपाळ लांडगे व दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या पुढाकाराने ऍड. आदेश कमलाकर भगत यांची बाळासाहेबांची शिवसेना दिवा उपशहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
▪️ दिवा शहरात बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद मोठी असून भाजपचे प्रमुख पदाधिकारी, दिव्यातील लाखो रेल्वे प्रवाशांचे नेतृत्व करणारे, उच्चशिक्षित, अभ्यासू आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेलले ऍड. आदेश भगत यांच्या शिवसेना प्रवेशाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला अधिक बळकटी प्राप्त झाली आहे. रोखठोक आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध असणारे ऍड. आदेश भगत यांनी केलेल्या अनेक उठाव व आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य दिवेकरांचा हक्काचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. पक्षांतर्गत कुरघोडीमुळे त्यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. येणाऱ्या पालिका निवडणूका लक्षात घेता ऍड. आदेश भगत यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली असल्याचे कळते.
▪️ “दिवा शहरात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे कार्य खूप मोठे आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे दिव्यात अनेक विकास कामे झाली असून अनेक विकास कामे प्रगती पथावर आहेत. दिवा शहरप्रमुख, माजी उपमहापौर रमाकांत मढवी व इतर नगरसेवकांच्या माध्यमातून देखील अनेक कामे मार्गी लागली आहेत. ही सर्व कामे दिवावसीयांपर्यंत पोहचवण्याचे मोठं काम आम्हला करायचे आहे. पक्षाने मोठी जवाबदारी खांद्यावर दिली असल्यामुळे पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार” असल्याचे ऍड. आदेश भगत यांनी सांगितले.