चिपळूण: कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण कळंबस्ते रेल्वे फाटकावरती उड्डाणपूल बांधण्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, तसेच माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात संबंधित अधिकारी वर्गा बरोबर बैठक संपन्न झाली. या बैठकीत या उड्डाण पुलाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली .
कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून चिपळूण येथील कळंबस्ते येथे रेल्वे फाटक आहे. या फाटकामुळे वाहतुकीच्या दृष्टीने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. सुरूवातीला ठराविक वेळी रेल्वे सुरू होत्या, परंतु आता कोकण रेल्वे मार्गावर अनेक रेल्वे गाड्या चालू असल्याने वाहतूकदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. फाटक बंद केल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बंद फाटकाच्या वेळेत वाहनांच्या रांगा लागतात, बंद फाटकाच्या वेळेत एखादी पेशंट घेऊन ॲम्ब्युलन्सला सुद्धा रस्ता क्रासिंग करता येत नाही त्यामुळे अनेक प्रसंग या रेल्वे फाटकामुळे निर्माण झालेले आहेत. या रस्त्याला लोटे चिरणी आंबडस मार्ग जोडले गेले आहे. त्यामुळे वाहतूकीचे प्रमाण वाढले आहे फाटक पडल्यानंतर दोन्ही रस्त्याच्या बाजूला वाहनांच्या रांगा लागतात त्यामुळे या रेल्वे फाटकावरती उड्डाणपूल व्हावे यासाठी स्थानिक ग्रामस्थ, वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकारी यांनी अनेक वेळा प्रशासनाला, आमदार, खासदारांना निवेदने दिलेली होती परंतु अद्यापही या विषयाला यश आले नव्हते.
भाजपा नेते माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी हा विषय हाती घेतला तसेच भारतीय जनता पार्टी चिपळूण तालुक्याच्या वतिने चिपळूण कळंबस्ते रेल्वे फाटकावरती उड्डाणपूल व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रविंद्र चव्हाण साहेब यांना निवेदन देण्यात आले होते . सर्वांच्या प्रयत्नांना यश येऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रविंद्रजी चव्हाण साहेब, माजी आमदार विनयजी नातू साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात संबंधित अधिकारी वर्गा बरोबर बैठक संपन्न झाली.आणि पहिल्याच बैठकीत या उड्डाणपूलाला प्रशासकीय मान्यता मिळाली. यावेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, खेड तालुकाध्यक्ष किशोर आंब्रे, रूशिकेश मोरे, गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद चाळके, जिल्हा चिटणीस विनोद भूरण, सहकार सेल जिल्हा संयोजक रत्नदीप देवळेकर, शिक्षक संघटनेचे अमोल भोबस्कर , उद्योग आघाडीचे जगदीश आंब्रे, संजय आंब्रे, विजय आंब्रे, तालुका उपाध्यक्ष शरद तेवरे तसेच कोकण रेल्वे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी उपस्थित होते.