नागपुरात हिवाळीअधिवेशन पहिला दिवस; 33,788 कोटींच्या पुरवणी मागण्या…

Spread the love

आमचे सरकार संविधानानुसार काम करत असून त्याचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. परभणीत (संविधानाच्या प्रतिकृतीची) विटंबना करणाऱ्या एका मानसिक रुग्णाला अटक करण्यात आली आहे…

नागपुरात हिवाळीअधिवेशन पहिला दिवस; 33,788  कोटींच्या पुरवणी मागण्या..

*नागपूर :*  महायुती सरकारचा काल नागपुरात मोठ्या थाटामाटात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला.  महायुतीच्या 39 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आजपासून नागपुरात विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. पहिल्या दिवशीच राज्याच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चाही करण्यात आली. पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने 33,788.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या, ज्यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’  योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तरतूद आहे. मंत्री उदय सामंत यांनी या पुरवणी मागण्या मांडल्या, ज्या अर्थसंकल्पीय वाटपासाठी सरकारने मागितलेला अतिरिक्त निधी आहे.

मागील अर्थसंकल्पात, माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना 1,500 रुपये मासिक भत्ता देण्यासाठी राज्य सरकारने वार्षिक 46,000 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती. 2.5 कोटींहून अधिक महिलांना मासिक हप्ते मिळाले आहेत. दरम्यान, मासिक हप्ते 1,500 रुपयांवरून 2,100 रुपयांपर्यंत वाढवून बजेट तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल,अशी घोषणा काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.  तसेच याचवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 36 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राजभवनात मंत्र्यांचे नाव जाहीर होताच समर्थकांकडून एकच जल्लोष; जोरदार घोषणाबाजी, शिट्टयाही फुंकल्या

राज्याच्या विकासासाठी कोटींची तरतूद…

सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 7,490 कोटी रुपये, उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागासाठी 4,112 कोटी रुपये, नगर विकासासाठी 2,774 कोटी रुपये, ग्रामीण विकासासाठी 2,007 कोटी रुपये आणि आदिवासी विकास विभागासाठी 1,830 कोटी रुपयांची तरतूद आहे. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पूर्ततेसह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात 20 विधेयके मांडण्याचा सरकारचा विचार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान नागपुरात होणार आहे.

बीडमधील  सरपंचाच्या हत्या प्रकरणावर चर्चा…

बीडमध्ये मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. सोमवारी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत संविधानाच्या प्रतिकृतीचे नुकसान आणि गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या हत्येवरून परभणीतील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला आणि सरकारकडे जाब विचारला.

दोन्ही घटनांवर सभागृहात चर्चा करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केले. ते म्हणाले, “मला विश्वास आहे की अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विरोधक सूचना देण्यास सहकार्य करतील. आमचे सरकार संविधानानुसार काम करत असून त्याचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. परभणीत (संविधानाच्या प्रतिकृतीची) विटंबना करणाऱ्या एका मानसिक रुग्णाला अटक करण्यात आली आहे.

फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांची ओळख…

फडणवीस यांनी नव्या मंत्र्यांचीही सभागृहात ओळख करून दिली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने आठ विधेयके पुन्हा मांडली, त्यापैकी काही जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि काही पंचायत समित्यांच्या उपाध्यक्षांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची दुरुस्ती होती.

10 डिसेंबर रोजी निधन झालेल्या महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एसएम कृष्णा यांनाही विधानसभेने श्रद्धांजली वाहिली. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीपद भूषवलेले कृष्णा 2004 ते 2008 या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल होते. नुकतेच निधन झालेले माजी आमदार दिनकरराव जाधव यांनाही सभागृहाने श्रद्धांजली वाहिली. जाधव यांनी 1980 ते 1988 या काळात राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page