पुणे ( विनोद चव्हाण) पुणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात येणाऱ्या आदर्श गोपालक पुरस्कार आंबेगाव तालुक्यातील तरुण शेतकरी अमोल काळे यांना पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते अल्पबचत भवन पुणे या ठिकाणी आज देण्यात आला.
आंबेगाव तालुका पासून सुमारे दोन कि.मी. अंतरावर आणि मंचरकडून भिमाशंकरकडे जाताना मध्यभागीअसलेल कृषिप्रधान गाव म्हणून घोडेगाव हे गाव ओळखले जाते. शांत, नयनरम्य परिसर. चहूबाजूने डोंगरांनी वेढलेले. डिंबा धारणा शेजारील गाव आहे. खाचरांची शेत जमिन, पावसावर अवलंबून असलेली जिरायती शेती येथे केली जाते. यावर्षी पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात येणाऱ्या आदर्श गोपालक पुरस्कार घोडेगावचे भूमिपुत्र अमोल काळे आणि जयश्री काळे या दांम्पत्याना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन पुणे जिल्हा पालकमंत्री महाराष्ट्रचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात करण्यात आले.
शेती आणि पशुपालन एकमेकाला पूरक आहेत पण अवकाळी पाऊस आणि लम्पी यासारखे महाआजार यामुळे शेतकरी मात्र त्रस्त झाला आहे. असे असताना घोडेगावचे सुपुत्र अमोल काळे यांनी दुग्ध व्यवसायात घेतलेली भरारी आदर्श ठरली आहे. एका छोटय़ा गावात मोकळा गोठा या पद्धतीने ४० संकरित गायींना जोपासणाऱ्या या आदर्श गोपालक म्हणून काळे कुटुंबाचा सन्मान आज पुणे येथे पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. दहा वर्षा पूर्वी जेमतेम अर्धा लिटर दूधा पासून सुरवात करून आत्ता दैनंदिन शंभर लिटर दुधा पर्यत गाठलेला यशस्वी टप्पा, एक गाय ते चाळीस गाई गोठ्यात सांभाळण्याचे काम काळे दापत्याने केले आहे. आय टी आय शिक्षण झाले असल्याने स्वतःचे गॅरेज सांभाळू घराकडे लक्ष देणे ह्या दुहेरी भूमिका निभावण्याचे काम त्यांनी केले आहे.
उत्कृष्ट कालवड व संगोपन आणि व्यवस्थापन त्यांनी केली आहे, आत्ता त्यांच्या गोठ्यात २२ गाई आहेत रोज १०० लिटर दुध दिवसाला मिळते. विषेश म्हणजे त्यांनी लहान कालवडी सांभाळतो, जास्त दुध देणाऱ्या कालवडी तयार करण्याचे उलेखनीय कामगिरी केली आहे. ३९ लिटर दुध एका गाई पासून मिळते यांचे कारण योग्य चारा आणि पाणी यांचे नियोजन आहे. दोन वेळा फक्त चार गाईना देण्याची सवय त्यांनी लावली आहे. गाई मुक्त संचार असल्याने आजारी पडत नाही, तहान लागेल तेव्हा पाणी उपलब्द असते, चारा बारीक करण्यासाठी कुट्टी मशीन आहे, दुध काढण्यासाठी अत्याधुनिक मशिनचा उपयोग केला जात आहे. दिवसातून फक्त दोन वेळा चारा देण्याची सवय लावण्यात आली आहे. आपण कशा प्रकारे सवयी गाईना लावतोय त्यावर अवलंबून असते असे अमोल काळे म्हणाले. या कार्यक्रमला व्यासपीठावर मान्यवर श्रीमती शालिनीताई कडू प्रकल्प संचालक जिल्हा परिषद पुणे, श्री आयुष प्रसाद (भाप्रसे) प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे, श्री. चंद्रकांत वाघमारे अति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे उपस्थित होते. तसेच त्यांचे भाऊ, बहिण आणि यद्नेश कणसे, साडू अनिल चिखले यांनी सहभाग घेतला होता.