*ठाणे/मुरबाड /प्रतिनिधी/ लक्ष्मण पवार –* समृध्दी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन मोठ्या दिमाखात पार पडले. या शानदार सोहळ्यात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड मधील दुर्गम भागातील लोकांना आपल्या वकीली पेशातुन मदतीचा हात पुढे करून सामान्य माणसाला न्याय मिळवून देणारे अँड. शरद थोरात
यांना या वर्षीचा मानाचा, सन्मानाचा समाज रत्न गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
इंटरनॅशनल इन्व्यारलमेंट मल्टीपर्पज ह्युमन सर्विस ऑर्गानायझेशन इंडीया, समृध्दी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था मुंबई यांच्या विद्यमाने ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालय राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन २०२४ मोठ्या दिमाखदार वातावरणात पार पडला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. स्वपखांच्या बळावर नवी क्षितीजे शोधणाऱ्या कर्तुत्वावान रत्नविरांचा सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष समाजसेवक दिनेश उघडे, उद्घाटक प्रसिद्ध चित्रपट निर्माती नेहा धुरी, राष्ट्रीय सचिव रिपाई (आ) चे सुरेशदादा बारशिंग, दानशूर व्यक्तिमत्व समाजसेवक मेहबूब भाई पैठणकर होते .तर प्रमुख अतिथी म्हणुन स्टार प्रवाह मधील प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी, आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपट अभिनेते झाकिर खान होते. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष समृध्दी प्रकाशनचे संचालक प्रा. डॉ. बी. एन. खरात व सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड होते. संमेलनाचे आयोजक व निमंत्रक समन्वयक संमेलन डोंबिवली आणि मुम्बईचे श्वेता शिर्के व विशाल देशमुख होते.
सोहळ्याचे अध्यक्षस्थान युवा नेते समाजसेवक दिनेश उघडे यांनी भूषवले. या राष्ट्रीय संमेलनात मुरबाड मधील अँड शरद थोरात यांना यंदाचा मानाचा,सन्मानाचा समाज रत्न पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानात प्रदान करण्यात आला. या पुरस्कारा बाबत मुरबाड मध्ये बार असोसिएशनच्या वतीने वतीने अभिनंदन केलं जात आहे तसेच आरपीआय आठवले पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष समाजसेवक दिनेश उघडे, यांनी त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव व अभिनंदन करून कौतुक केले