रत्नागिरी बलात्कार करुन खुन करणाऱ्या आरोपीला फाशी होणाचा निकाल रत्नागिरी जिल्ह्याच्या ईतिहासात प्रथमच घडला आहे . यापुर्वी रत्नागिरीसिंधुदुर्ग एक जिल्हा असताना ४५ वर्षापुर्वी सिंधुदुर्गात आरोपीला फाशी झाली होती . अत्यंत धिरोदात्त आणि हुशारीने केस लढवुन गुन्हेगाराला फाशीची शिक्षा मिळवुन दिल्याबद्दल मुलीच्या आई वडीलांच्या डोळ्यात न्याय मिळाल्याने समाधान दिसत होते तर राज्यभरातुन ॲड शेट्ये यांचे अभिनंदन होत आहे .
ज्याच्या सोबत कोणी नाही त्याच्या सोबत भंडारी ! या वाक्याचा खरेपणा दाखवत ॲड शेट्ये यांनी लढा दिला त्याबद्दल भंडारी समाजाने त्यांचे अभिनंदन करुन, अन्यायाविरुद्ध लढणे हा भंडारी जातीचा गुणधर्म आहे त्यामुळे आपण असेच लढत रहा संपुर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे याची ग्वाही दिली .