
मुंबई : एसटी सहकारी बँकेच्या निवडणुकीत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयाचा कार्यकर्त्यांकडून वाजतगाजत जल्लोष करण्यात आला. विजयाचा जल्लोष करतानाचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये हातात भगवे झेंडे, गळ्यात भगवे पंचे तसेच डोक्यावर भगव्या टोप्या ज्यावर वंदे मातरम् असं लिहिलेलं आहे. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात कुठल्याही महापुरुषांचे फोटो नव्हते पण एकाच्या हातात नथुराम गोडसेचा फोटो मात्र होता. व्हिडिओमध्ये हे चित्र स्पष्टपणे दिसत आहे