मुंबई- राज्यात विधान सभा निवडणुका जवळ आल्या आहेत. यामुळे राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय. तसेच राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना देखील वेग आला आहे. अनेक इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून तिकीट मिळण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. तर काहीजण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या, मारत आहेत. या धामधुमीत आज अभिनेते सयाजी शिंदे यांनी हाताला घड्याळ बांधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांना पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून निवडण्यात आले आहे. सयाजी शिंदे यांनी अजित पवार यांच्या पक्षात का प्रवेश केला याचे कारण देखील सांगितलं आहे.
आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सयाजी शिंदे यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ उपस्थित होते. अभिनेते सयाजी शिंदे हे पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहेत. पक्ष प्रवेशावर सयाजी शिंदे म्हणाले, मी आज पर्यंत सिनेमात काम केलं असून प्रामुख्याने व्हीलन म्हणून काम भूमिका साकारली आहे. आज मी नव्या भूमिकेत प्रवेश केला आहे. समाज हितासाठी सिस्टीममध्ये जाऊन काम कराव लगतनभे लक्षात आलं आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पद्यावरणभोट जोपासताना यांवरही मी २२ लाख बिया वाटल्या आहेत. आता काय हटायच नाही,जे व्हायच ते होऊ देत. त्यामुळे प्रवेश करत आहे असेही ते म्हणाले. मला भरपूर मिळालं आहे. त्यामुळे राजकारणात येऊन काही मिळवायच नाही. चांगल काम करायचं आहे हेच उद्दिष्ट ठेवून मी काम करणार आहे असे सयाजी शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.
सयाजी शिंदे यांचा राजकारणातील प्रवास यशस्वी होईल. आपण एकत्र येऊन नवीन अध्याय लिहू. त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. सर्वांना बरोबर घेऊन जायचं ही आपली भूमिका आहे. फुले, आंबेडकरांची विचारधारा ढळू द्यायची नाही. हा आमचा प्रयत्न आहे. एक चागंला निर्णय झाला”, असं मत अजित पवार यांनी यावेळी मांडलं. मी जास्त चित्रपट पाहत नाही. पण मी सयाजीरावांचे काही सिनेमे पाहिले. प्रत्येकाला अभिनेते अभिनेत्री आवडते. सयाजीरावांनी वेगळ्या प्रकारचा ठसा निर्माण केला. राज्यातील कोणत्याही व्यक्तीने एखाद्या क्षेत्रात ठसा उमटवला तर अभिमान वाटतो. आपली माणसं नाव लौकीक निर्माण करतात याचा अभिमान वाटतो. सयाजी शिंदे यांच्या चित्रपटाने जागरूकता निर्माण केली आहे. त्यांनी सामाजिक कार्यातही ओतून घेतलं आहे. त्यांची माझी अनेक वर्षापासूनची ओळख आहे, असं अजित पवार म्हणाले.