पनवेल- पनवेल शहर परिसरात बेकायदेशीररित्या देहविक्रीचा धंदा फोफावत चालला असून त्यांच्या विरोधात पनवेल शहर पोलिसांनी धडक कारवाई मोहीम आखली आहे.
पनवेल शहर बस स्थानक परिसर, रोज बाजारासमोरील मोकळे मैदान, काही लॉज परिसर याठिकाणी गेल्या काही दिवसापासून बेकायदेशीररित्या देहविक्रीचा धंदा फोफावत चालला होता या संदर्भातील तक्रारी अर्ज करण्यात आले होते. तसेच या भागातून ये जा करणार्या महिलांनासुद्धा नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने अश्या महिलांविरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. व कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.