नेरळ: सुमित क्षीरसागर रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी १ या कार्यालयात तक्रारदार यांना कर्जत येथील जागेच्या दस्तांच्या साक्षांकित प्रती देण्याकरिता सात हजारांची लाच घेणाऱ्या खासगी इसम मोहन पुंडलिक गायकवाड(वय ३५ वर्षे रा. मुक्काम बीड, ता. कर्जत, जि. रायगड )यास नवी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,तक्रारदार यांना कर्जत येथील जागेच्या १० दस्तांच्या साक्षांकित प्रती देण्याकरिता दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी १, कर्जत १, रायगड येथील खाजगी इसम मोहन गायकवाड यांनी तक्रारदार यांचे कडे ७,०००/- रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत दिनांक १७ /१०/ २०२३ रोजी तक्रार प्राप्त झाल्याने दि. १७/१०/२०२३ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता वर नमूद आरोपी यांनी पंचा समक्ष रुपये ७,०००/- लाचेची रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न होवुन दि. १७/१०/२०२३ रोजी सापळा कारवाईदरम्यान आरोपी यांना तक्रारदार यांच्याकडून रुपये ७,०००/- लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
सदर सापळा कारवाई यशस्वी करण्यासठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र चे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे,अप्पर पोलीस अधीक्षक
अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाल लाच लुचपत विभाग रायगडचे उप अधीक्षक पो. उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे
पोलिस हवालदार प्रदीप जाधव, नितीन पवार चालक पोलिस हवालदार रतन गायकवाड,
पोलिस नाईक संतोष तम्हाणेकर , महिला पोलिस नाईक उमा बासरे ,योगेश नाईक,सचिन माने, निखिल चौलकर यांनी केली आहे.