
ठाणे : मागील एक आठवड्यापासून दिवा मुंब्रा खाडीत वाळू माफियांकडून दिवसा अवैध पद्धतीने वाळू उपसा केला जात होता. जिल्हा प्रशासनाकडून वाळू माफीयांच्या या कृत्याकडे सर्रास डोळेझाक होत असल्याचे स्थानीक लोक प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनकडून वारंवार तक्रार होत असताना . प्रशासनाच्या उशिराने जाग आलेल्या ठाणे जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी दुपारी भिवंडी कल्हेर खाडीत अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली. या कारवाईत ५० लाखांचा मुद्देमाल नष्ट केला.
यानंतर जिल्हा महसूल विभागाकडुन शुक्रवारी भिवंडी तालुक्यातही काल्हेर खाडीत अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली. खाडी मधील अवैध रेती आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांनी कडक कारवाई करण्याचे व गस्त घालण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाचे फिरते पथक व भिवंडी तहसील कार्यालय, भिवंडी मंडळ अधिकारी व भिवंडी व खारबाव तलाठी यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली.
यामध्ये २ बार्ज, ३ पंप आढळून आले. सर्व बार्ज व पंपचे वॉल काढलेले असल्याने ते किनारी भागात आणणे शक्य नसल्याने जागेवर जाळून खाडी मध्येच बुडवून नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
जाहिरात

जाहिरात





