
रत्नागिरी : मालगुंड ते जयगड जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी गायवाडी बीच येथे देशी दारु पिणाऱ्यावर जयगड पोलिसांनी कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलीस शिपाई अन्वी पुसाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली. यानुसार संशयित आरोपी प्रमोद रघुनाथ मेस्त्री (वय ५३, मालगुंड) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे शुक्रवारी कारवाई करण्यात आली.