झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनचा दौरा करणार, रशियाच्या भूमिकेकडे लक्ष… नरेंद्र मोदींचा यूक्रेन दौरा…

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑगस्टला यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. झेलेन्स्की यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत मोदी दौऱ्यावर जाणार आहेत….

*नवी दिल्ली :* पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विदेश दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ऑगस्टपासून दोन देशांच्या विदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. विशेष बाब म्हणजे या दौऱ्यात नरेंद्र मोदी यूक्रेनचा (Narendra Modi Ukraine Tour) दौरा देखील करणार आहेत. मोदींचा यावेळचा विदेश दौरा पोलंड आणि यूक्रेन या दोन देशांमध्ये असेल. नरेंद्र मोदी प्रथम पोलंडनंतर यूक्रेनच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत पुष्टी करण्यात आल्याची माहिती आहे. 

यूक्रेनचा दौरा करत असल्यानं रशिया काय भूमिका घेणार…

रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध सुरु झाल्यानंतर भारतानं दोन्ही देशांनी युद्धाचा मार्ग वापरण्याऐवजी सांमजस्यानं अन् चर्चेनं विषय सोडवावा अशी भूमिका घेतली होती. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचा दौरा केला होता. आता नरेंद्र मोदी पोलंड आणि यूक्रेनचा दौरा करणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.  नरेंद्र मोदी यूक्रेनचा दौरा करत असल्यानं रशिया काय भूमिका घेणार हे देखील पाहावं लागणार आहे.

पोलंड आणि यूक्रेनच्या राष्ट्रप्रमुखांनी दिलेल्या आमंत्रणानंतर नरेंद्र मोदी या देशांचा दौरा करणार….

परराष्ट्र मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या सचिव तन्मया लाल यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. पोलंड आणि यूक्रेनच्या राष्ट्रप्रमुखांनी दिलेल्या आमंत्रणानंतर नरेंद्र मोदी या देशांचा दौरा करणार आहेत. पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क आणि यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदीमीर झेलेंस्की यांनी मोदींना आमंत्रण दिलं होतं.

पंतप्रधान मोदी 23 ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर…

नरेंद्र मोदी  रशिया यूक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. रशिया युक्रेन युद्धानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिलाच युक्रेन दौरा असल्यानं जगभरातील नेत्यांचं मोदींच्या दौऱ्याकडे लक्ष असेल.  पंतप्रधान मोदी 23 ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर जातील तत्पूर्वी ते 21 आणि 22 ऑगस्टला पंतप्रधान पोलंड देशाचा दौरा करणार आहेत.

भारतानं रशिया आणि यूक्रेन यांच्यातील वाद हा वाटाघाटी आणि चर्चेनं सोडवावा अशी भूमिका घेतलेली आहे. वाटाघाटी  आणि चर्चेच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते, अशी भारताची भूमिका आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूक्रेन दौऱ्याकडे जगभरातील प्रमुख देशांचं लक्ष असेल. रशियानं फेब्रुवारी 2022 मध्ये यूक्रेनवर आक्रमकण केलं होतं. यूक्रेनला नाटोचं सदस्यपद देण्यात येऊ नये यासाठी रशियानं आक्रमक भूमिका घेतली होती. नाटोचं सदस्यपद यूक्रेनला मिळाल्यास नाटोच्या सदस्य देशांचं सैन्य देखील रशिया यूक्रेन सीमेपर्यंत पोहोचू शकत, त्यामुळं रशियाचा यूक्रेनच्या नाटोच्या सदस्यपदाला विरोध आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदींचा यूक्रेनचा दौरा 23 ऑगस्ट रोजी असेल. भारताचे पंतप्रधान 30 वर्षानंतर यूक्रेनच्या दौऱ्यावर जात आहेत. तर, 45 वर्षानंतर भारतीय पंतप्रधान पोलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page