“पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजींचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेतृत्त्व निदान आता तरी मान्य करा.” – मा. आमदार बाळ माने.

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | सप्टेंबर ०८, २०२३.

ज्यांचा गौरवपूर्ण उल्लेख करताना जगभरातील राजकीय विचारवंत, विद्यमान आंतरराष्ट्रीय महाशक्ती आणि आंतरराष्ट्रीय नेते थकत नाहीत अशा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना भारतातील विरोधी पक्ष आणि त्यांचे समर्थक मात्र कायम पाण्यात पहातात. एक भारतीय या नात्याने पंतप्रधानपदाची गरिमा राखण्याचे घटनात्मक दायित्व नागरिकांवर असते; मात्र कमालीचा मोदीविरोध या दायित्वावर सातत्याने भारी पडतो. आणि अगदी अर्वाच्य पातळीवर येऊन मोदीजींवर टिप्पण्या करण्यात विरोधी कार्यकर्ते आनंद मानतात. पण आज माजी पंतप्रधान आणि राष्ट्रीय काँग्रेसचे नेते मा. श्री. मनमोहन सिंग साहेबांनी केलेल्या मोदीजींच्या स्तुतीमुळे राजकीय वाद बाजूला सारून एक सच्चा नागरिक म्हणून पहा मोदीजींचे प्रेरक आणि स्वकष्टार्जित आंतरराष्ट्रीय ख्याती नक्की दिसेल.

स्वतः मनमोहन सिंग साहेब म्हणतात, “कोणत्याही दबावात न येता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारताचे हित शीर्षस्थानी ठेऊन योग्य धोरण स्विकारले आहे.” असे म्हणणारे आदरणीय मनमोहन सिंगजी हे कोणी ऐरेगैरे नाहीत. मोदीजींच्या आधी सलग १० वर्षे त्यांनी पंतप्रधान म्हणून काम करण्याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाचा अर्थ विरोधकांच्या कल्पनाशक्तीला भेदून जाणारा असणार याची मला पूर्ण खात्री आहे. “रशिया-युक्रेन युद्धानंतर भारताने नवीन जागतिक व्यवस्थेचा मार्ग दाखवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मी भारताच्या भवितव्याबाबत खूप आशावादी आहे.” असा विचार व्यक्त करण्यासाठी अनुभव आणि त्यासोबतच मनाचा मोठेपणा लागतो. मी एक समाजव्रती कार्यकर्ता या नात्याने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या या भूमिकेचे अभिनंदन करतो.

सिंग साहेब पुढे म्हणतात, “माझ्या आयुष्यात भारताला जी-२० च्या अध्यक्षपदाची संधी मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे.” वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चीनसोबत सुरु असलेल्या तणावाबाबत ते म्हणाले की, “मला आशा आणि विश्वास आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या प्रादेशिक आणि सार्वभौम अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आणि द्विपक्षीय तणाव कमी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलतील.” ज्यावेळी विरोधी पक्षाचा बुजुर्ग नेता अशाप्रकारे विश्वास प्रगट करतो, त्यावेळी हा देशातील तमाम जनतेला उद्देशून दिलेला एक संदेशच असतो. नवमतदारांनी आपल्या पहिल्या मतदानाच्या वेळी हा संदेश ध्यानात ठेवावा तर इतर नागरिकांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या या वक्तव्याचा आधार घेऊन भारताचा इतिहास तपासून घ्यावा. भारत महाशक्ती आणि विश्वगुरु एकाच वेळी होणार हे निश्चित. मात्र त्यासाठी २०२४ मध्ये जनतेचा उदंड विश्वास मोदीजींच्या सोबत असणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन भाजपा नेते, रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. बाळासाहेब माने यांनी केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page