जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | फेब्रुवारी ०२, २०२३.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते, आमदार डॉ. राजन साळवी यांच्या एसीबी चौकशीनंतर त्यांचे स्वीय्य सहाय्यक सुभाष मालप यांना एसीबीने नोटीस धाडली आहे.
मालप यांना रायगड एसीबीची नोटीस प्राप्त झाली आहे. यामध्ये राजन साळवी यांच्या सुरु असलेल्या चौकशीच्या अनुषंगाने जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. नोटीसमध्ये आज हजर राहण्याचा उल्लेख आहे. या साऱ्या प्रकाराने रत्नागिरीत खळबळ उडाली आहे.