ठाणेकरांसाठी आर्थिक शीस्तीचा कोणतीही करवाढ दरवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर : अभिजित बांगर

Spread the love

ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) कोणतीही करवाढ व दरवाढ नसणार काटकसरीचा आर्थिक शिस्तीचा सन २०२३-२४ चा ४३७० कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांची छाप असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कोणत्याही जुन्या प्रकल्पांचा यात समावेश नसून मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अंतर्गत शिक्षण, आरोग्य, शहर सौंदर्यीकरण, खड्डेमुक्त रस्ते, शुन्य कचरा मोहीम आदी महत्वाच्या मुद्यांचा यात समावेश करण्यात आला आहे

ठाणे महापालिकेच्या वतीने २०२२-२३ मध्ये ३३८४ कोटींचा अर्थसंकल्प तयार केला होता. मात्र काही विभागांच्या उत्पन्नात घट येत असल्याने महसुली उत्पन्न ३०२१ कोटी ५१ लाखा ऐवंजी २७८५ कोटी ४५ लाखांचा अर्थसंकल्प सुधारीत करण्यात आला आहे. अशा प्रकारे २०२२ -२३ मध्ये आरंभीच्या शिल्लकेसह सुधारीत अंदाजपत्रक ४२३५ कोटी ८३ लाख व सन २०२३-२४ मध्ये आरंभिची शिल्लेकसह मुळ अंदाजपत्रक ४३७० कोटींचे सादर करण्यात आले. कोणतीही करवाढ दरवाढ नाही, महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, खर्चात वित्तीय शिस्त, अनावश्यक महसुली खर्चात कपात, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या त्रीसुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी, भांडवली कामांअंतर्गत हाती घेतलेली कामे पूर्ण करणे, प्रशासकीय कामात सुधारणा, प्राप्त अनुदानातील कामे विहित वेळेत पूर्ण करणे, कामांचा दर्जा उत्तम ठेवणे आदी महत्वाची उद्दीष्टे या अर्थसंकल्पातील आहेत.

ठाणे अभियानाला महत्व- स्वच्छ ठाणे अंतर्गत शुन्य कचरा मोहीम राबविणे, हस्तांतरण स्थानक, डायघर प्रकल्प कार्यान्वित करणे, दिवा क्षेपणभुमी बंद करणे, सार्वजनिक रस्ते साफसफाई आदींसह स्वच्छ शौचालया अंतर्गत शौचालय नुतनीकरण व पुनर्बांधणी, सार्वजनिक शौचालयांची उभारणी, कंटेनर शौचालय उभारली जाणार आहेत. याशिवाय खड्डेमुक्त ठाणे अंतर्गत मजबुत रस्त्यांचे जाळे, सिमेंट क्राँक्रीट रस्त्यातील अंतर सांधे भरणे, चरांचे पुनपृष्टीकरण, रस्त्यांच्या कामांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी विशेष लक्ष आदी कामे केली जाणार आहेत. तर सुंदर ठाणे अंतर्गत शहर सौंदर्यीकरणावर भर देणे, एकात्मिक तलाव संवर्धन व सुशोभिकरण, सीएसआर माध्यमातून तलाव संवर्धन आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.

याशिवाय मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना राबविली जाणार आहेत. तसेच यात आशा स्वयंसेविकांना अतिरिक्त मानधन, अ‍ॅनोमली स्कॅन,प्रसुतीगृहांचे बळकटीकरण, पोषण आहार, माृतत्व भेट आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.

पार्कींग प्लाझा येथे मल्टीस्पेशॅलीटी हॉस्पीटल, माझी आरोग्य सखी, महापालिका हद्दीत सीबीएससी शाळा सुरु करणे, कळवा रुग्णालयाचे बळकटीकरण, मराठी शाळांचे सक्षमीकरण, इंग्रजी माध्यमांच्या नवीन शाळा सुरु करणे, अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा सक्षम करणे, दिवा व मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत वितरण व्यवस्था, झोडपट्टी तिथे वाचनालय, वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी उपाय योजना,घाटकोपर ते ठाणे दरम्यान इर्स्टन फ्री वे चा विस्तार, आनंद नगर ते साकेत उन्नत मार्ग, ठाणे शहर व कोपरी पूर्व वागळे इस्टेटला जोडणे, पार्कींग, क्लस्टर योजना,अंतर्गत मेट्रो, प्रदुषण मुक्त व धुळमुक्त ठाणे, धर्मवारी आनंद दिघे स्वंयरोजगार योजना, फेरीवाला धोरण, प्रशासकीय कामात सुधारणा, म्युनिसीपल फंड, आदी महत्वाच्या बाबींचा यात समावेश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट जनशक्तीचा दबावर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page