खोपोली : (सुमित क्षीरसागर) खोपोली येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे बिल मिळाले नाही म्हणून पुण्याचे आल्हाट आर्ट स्टुडिओ चे मालक आल्हाट हे उपोषणाला बसले होते.वास्तविक पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा बसवून दोन वर्षे झाली तरी शिल्पकारास संपुर्ण बील अदा करण्यात आलेले नाही, ही बाब खोपोलीकरांसाठी निश्चितच लाजिरवाणी म्हणावी लागेल. या संदर्भात ‘आप’ चे खोपोली शहर उपाध्यक्ष शिवा शिवचरण यांनी दिनांक 28 मार्च 2023 रोजी खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व उपमुख्याधिकारी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु भेट न झाल्यामुळे उपमुख्याधिकारी भगळे यांच्याशी उपोषण संदर्भात मोबाईल वरून संपर्क करून विचारणा केली असा उपमुख्याधिकारी गौतम भगळे यांनी माहिती न सांगता उर्मट व आरेरावी आणि दादागिरीचे भाषेत बोलून तुला काय करायचे आहे ? तू कोण ? जा रे तुला काय अधिकार ? तू किती टॅक्स भरतो ? जास्त हुशारी केल्यास तर पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली आणि तशी पोलीस तक्रार देखील दाखल केली.
सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावर एक सामान्य नागरिक म्हणून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता उपमुख्याधिकारी भगळे यांनी आरेरावीपणे दादागिरीच्या भाषेत बोलून संविधानाच्या अधिकाराचा तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा अपमानच केला आहे.
आरेरावी व दादागिरीच्या भाषेत अर्वाच्य बोलणाऱ्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान करणाऱ्या उर्मठ उपमुख्याधिकारी गौतम भगळे व त्यांच्या सहकारी महिला अधिकारी मीनल जाधव यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा आम आदमी पार्टीच्या खोपोली खालापूर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
सदर प्रकरणी भगळे यांच्या निलंबनासाठी निवेदन खोपोली नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अनुप दुरे यांना देण्यात आले असून आठ दिवसांमध्ये याबाबत कारवाई न झाल्यास आम आदमी पार्टी तीव्र आंदोलन करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.comवर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा
भ्रमणध्वनी क्र.९८१९९४६९९९/८९२८६२२४१६
८८९८८३४२३४/९६१९१०५७७३