
ठाणे मतदाता जागरण अभियानाचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार
दिवा (प्रतिनिधी) ठाणे महानगरपालिका हद्दीत धोकादायक,अतिधोकादायक इमारती तसेच अनधिकृत बांधकामे,झोपडपट्टी,चाळी,दुकाने यांचा पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना राबविण्याचा निर्णय ठामपाने घेतला आहे. मात्र नेमकी ही क्लस्टर योजना किती फायद्याची किंवा तोट्याची आहे ?याबाबत जनजागृती करण्यासाठी जागा हो दिवेकर या सामाजिक संस्थेमार्फत आज 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता नागनाथ मंदीर,दिवा स्टेशन (पुर्व) येथे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या मार्गदर्शनपर कार्यक्रमात ठाणे मतदाता जागरण अभियानाचे पदाधिकारी श्री अनिल शाळीग्राम,श्री उन्मेश बागवे आणि चेतना दिक्षित आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.दिव्यातील जनतेची फसवणुक होऊ नये.त्यांना ठाणे महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणारी योजनेतील वास्तव समजावे यासाठी दिव्यातील सेव्ह दिवा फाऊंडेशन,शिवशक्ती रिक्षा युनियन,आदर्श कोकण संस्था,तन्वी फाऊंडेशन,श्री समर्थ मित्रमंडळ,नवरुप मित्रमंडळ,नागनाथ केबल नेटवर्क,आदर्श मित्रमंडळ,नरेश्मा फाऊंडेशन,अंकुश मित्रमंडळ आदी संस्थाही या कार्यक्रमात सहभाग घेणार आहे.
दिवेकर नागरिकांनी क्लस्टरविषयी माहीती घेण्यासाठी घेण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन जागा हो दिवेकर फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री विजयदादा भोईर यांनी केले आहे.